दैनिक स्थैर्य । दि. २६ फेब्रुवारी २०२२ । फलटण । “सरस्वती शिक्षण संस्था संचलित” प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल व जुनिअर कॉलेज गुणवरे येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. इयत्ता पहिली मधील अर्णव बनकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली होती.
तसेच विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची भूमिका साकारली होती. यु.के.जी मधील आनंदी लंगुटे , इयत्ता चौथी मधील आदित्य कदम, स्मित बनकर व इयत्ता पाचवी मधील श्रेया शेलार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित भाषण केले. इयत्ता सहावी मधील विद्यार्थ्यांनी “प्रतापगडावरील भेट” हा पोवाडा अत्यंत उत्कृष्टपणे सादर केला.
इयत्ता पाचवी व सहावी मधील विद्यार्थ्यांनी ‘ जगदंब जगदंब ‘ या गाण्यावर नृत्य सादर केले.संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका आदरणीय सौ. संध्या गायकवाड मॅडम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कसे आचरणात आणावे याचे मार्गदर्शन केले व शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या संचालिका आदरणीय सौ. प्रियंका पवार मॅडम यांनी मोलाचा संदेश देऊन शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे आयोजन सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव विशाल पवार, सरस्वती शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापिका संचालिका सौ. संध्या गायकवाड, सरस्वती शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ.प्रियंका पवार, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सुनील आहिरे, विद्यालयाचे पर्यवेक्षक किरण भोसले, विद्यालयाच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या समन्वयिका सौ. सुप्रिया सपकाळ यांनी केले.
कु प्राजक्ता चव्हाण हिने सूत्रसंचालन केले तर कु. रितिका सस्ते हिने कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला.