
दैनिक स्थैर्य | दि. १९ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
राजाळे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने शिवप्रतिमेचे पूजन राजाळे गावच्या सरपंच सौ. सविता शेडगे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वांनी अभिवादन केले. यावेळी माजी सनदी अधिकारी श्री. विश्वास भोसले यांनी शिवचरित्राचे कथन केले. कार्यक्रमास गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.