
दैनिक स्थैर्य | दि. २१ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती १९ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरी झाली. फलटण येथील पुनर्वसित गोळेगावमध्ये शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून फलटण शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक नलवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे, धापते, यादव, क्षीरसागर यांची उपस्थिती लाभली.
यावेळी सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. गोळेगावमधील सर्व शिवप्रेमी, गावातील सर्व ग्रामस्थ याठिकाणी उपस्थित होते.
पद्मावती नवतरुण क्रिडा मंडळातील मुलांनी किल्ले रायरेश्वर येथून शिवज्योत घेऊन गोळेगावपर्यंतचा प्रवास केला. गोळेगावमधील सर्व शिवप्रेमींचे पोलीस अधिकारी यांनी कौतुक केले आणि सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
शिवरायांच्या संपूर्ण चारित्र्यावर भाष्य करून जयंतीच्या निमित्ताने मुलांवर चांगले संस्कार करावेत, असे अधिकार्यांनी सांगितले.
उपस्थितांचे स्वागत आकाश गोळे यांनी केले तर आभार सचिन शेगर यांनी मानले.
कार्यक्रमास सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ तसेच तरुण वर्ग उपस्थित होता.