
दैनिक स्थैर्य | दि. २१ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
सोनवडी खुर्द (ता. फलटण) येथे ग्रामपंचायतच्यावतीने गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस सरपंच श्रीमती शालिनीताई सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांनी शिवाजी महाराजाच्या प्रतिमेस अभिवादन केले.
याप्रसंगी सरपंच श्रीमती शालिनीताई सूर्यवंशी, उपसरपंच शरद सोनवलकर, ग्रामसेवक सुरेश निबाळकर, अरविंद सोनवलकर, सदस्य सचिन सूर्यवंशी, युवानेते अक्षय सोनवलकर, संजय मोरे, विश्वास पवार तसेच प्राथमिक शाळा मुख्याध्यापक शिंदे मॅडम, अंगणवाडी शिक्षिका सोनवलकर मॅडम, अंगणवाडी सेविका सोनवलकर मॅडम, कर्मचारी ज्ञानेश्वर सोनवलकर व राजू आडके आदी मान्यवर उपस्थित होते.