
दैनिक स्थैर्य । 27 एप्रिल 2025। फलटण । छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती, फलटण तालुक्याच्या वतीने यंदाच्या शिवजयंती उत्सवाला भव्य स्वरूप देण्यात आले आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसर आणि गजानन चौक येथे ऐतिहासिक कमानी, भगवामय सजावट आणि अश्वारूढ पुतळ्यांनी शिवभक्तांना आकर्षित केले आहे. ग्रामीण-शहरी क्षेत्रातील विविध मंडळांनी गड-किल्ल्यांवरून शिवज्योत आणण्याची तयारी केल्याने संपूर्ण परिसर स्वराज्याच्या गौरवाने झळकत आहे.
२८ एप्रिल २०२५ : रात्री ८:३० वाजता “स्वराज्याचा छावा” या विषयावर नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान आणि रात्री ११:३० वाजता शिवतीर्थ येथे अभिषेक सोहळा.
२९ एप्रिल २०२५ : सकाळी ८:०० वाजता मुधोजी क्लब, माळजाई मंदिर परिसरातून भव्य बाइक रॅली.
२९ एप्रिल २०२५ : सायंकाळी ५:३० वाजता दिव्य मिरवणूक. मिरवणुकीत भगवे झेंडे लावलेल्या मोटरसायकली-सायकली, ढोल-ताशे, लेझर शो आणि शिवकालीन पोशाखधारी कलाकारांचा समावेश असेल.
तालुक्यातील शिवभक्तांनी मोटरसायकल आणि सायकलींना भगवे झेंडे लावून राजेच्या पराक्रमाचे प्रतीक साकारले आहे. समितीच्या वतीने सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांची शोभा वाढवण्याचे आवाहन केले आहे.