
दैनिक स्थैर्य । 17 एप्रिल 2025। फलटण । येथील नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीं वैष्णवी फाळके व अक्षदा ढेकळे यांना शासनाच्या क्रीडा विभागाच्यावतीने दिला जाणारा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्काराचे वितरण शुक्रवार दि. 18 रोजी बालेवाडी (पुणे) येथील शिवछत्रपती क्रीडा नगरी येथे केले जाणार आहे.
त्या दोघीही भारताच्या आंतरराष्ट्रीय हॉकी संघात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहेत. या शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती सविताकाकी सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), संस्थेचे सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), तसेच नियामक मंडळाचे सर्व सदस्य, प्राचार्य डॉ. उदय जाधव, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी – विद्यार्थीनीं यांच्यासह संस्थेच्या सर्व शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी – विद्यार्थीनीं अभिनंदन केले.