शिरवळ सरपंच लक्ष्मी पानसरे यांनी शिवसेना शिरवळ शहरप्रमुख विजय गिरे यांचे नाव न घेता टीका केली


 

स्थैर्य, खंडाळा, दि.१५: छञपती शिवाजी महाराज गार्डन हे दिवंगत रविंद्र पानसरे यांचे दुरदृष्टीमधील एक काम आहे. गेल्या तीन वर्षामध्ये अंतर्गत रस्त्याची व इतर केलेली विकासकामे अशी चार कोटी पंचवीस लाखांची विकासकामे शिरवळमध्ये केली आहे. ही सर्व कामे प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यांच्या वार्डामध्ये केलेली आहे.आमच्या कुंटूंबाची व पार्टीची विकासाची शिकवण असल्यामुळे विरोधासाठी असले रडीचे डाव आम्ही करत नाही.आजपर्यंत कामे केली आहेत ती पारदर्शक केली असून त्यामध्ये कधी विरोधकांचे काम आहे म्हणून हाणून पाडलेले नाही.सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका काल,आज आणि उदयाही कायम आहे.कोणीतरी शिकवते म्हणून पोपट बनणे स्वताः च्या बुध्दिमतेची हसू करुन घेणे आहे.

अशी टिका शिरवळ सरपंच लक्ष्मी पानसरे यांनी शिवसेना शिरवळ शहरप्रमुख विजय गिरे यांचे नाव न घेता केली.

शिवसेना शिरवळ शहरप्रमुख विजय गिरे यांनी विभागीय आयुक्तांकडे दाखल केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर खंडाळा येथील शासकीय विश्रामगृह याठिकाणी आयोजित पञकार परिषदेप्रसंगी त्या बोलत होत्या.

शिरवळ सरपंच लक्ष्मी पानसरे पुढे म्हणाल्या,

माझ्या विरुध्द जे षडयंञ रचले जात आहे त्याला मुळीच मी घाबरत नाही ग्रामसभेतसुध्दा गार्डनचा विषय सर्व ग्रामसभेने मान्य केला आहे असे असतानासुध्दा शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर ते चूकीचे आहे. कोणाला फेसबुक, व्हाँटसअँपवरुन निराधार टीका केली म्हणजे आपण मोठे झालो असे कोणी समजू नये. गैरवर्तणूक हे आमच्या रक्तात नाही.त्यामुळे गैरवर्तणूक याविषयावर कोणी बोलू नये असे शब्दप्रयोग वापरण्याची कोणी हिंमत करु नये.जे काल-परवा परिपञक काढून मला बदनाम करतात त्यांचा अतिक्रमणाचा मुद्दा काढला तर त्यांना तोंड दाखवायला सुध्दा जागा राहणार नाही.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप सूर्यवंशी,भारतीय जनता पार्टी माजी खंडाळा तालुकाध्यक्ष राहुल हाडके,शिवसेना वाई विधानसभा संघटक प्रदिप माने,ग्रामपंचायत सदस्य महेश जाधव,कविता माने आदी उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!