
दैनिक स्थैर्य । दि. २७ मार्च २०२२ । फलटण । रविवारी दि. २७ रोजी सकाळी 10:00 वा शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शनाचा समारोप समारंभ व नूतन पदाधिकार्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम होणार असून केंद्रीय राज्यमंत्री देवुसिंग चौहान यांच्या हस्ते व माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार आहे.
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेतून जाधववाडी, ता.फलटण येथील शुभारंभ लॉन्स येथे केंद्रीय मंत्रालयातील विविध विभागांचे भव्य प्रदर्शन गेली दोन दिवस सुरु असून त्याचा समारोप केंद्रीय राज्यमंत्री देवुसिंग चौहान यांच्या हस्ते व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, आमदार राम सातपुते, भाजपा राज्य सरचिटणीस विक्रम पावसकर, फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अॅड. सौ.जिजामाला नाईक निंबाळकर. भाजपा सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
यावेळी सातारा जिल्हा अध्यक्षपदी आमदार जयकुमार गोरे यांची तर विक्रम पावसकर यांची राज्य सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल तसेच सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी महाराष्ट्रमध्ये भाजपाचे सर्वात जास्त ग्रामपंचायत सदस्य व नगरसेवक निवडून आल्याबद्दल या सर्वांचा सत्कार केंद्रीय राज्यमंत्री देवुसिंग चौहान यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांसह नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.