शिंगाडे यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण: फलटणचे सुपुत्र व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा आगाराचे अधिकारी राहुल श्रीरंग शिंगाडे यांनी कोरोना विषाणू महामारीच्या दरम्यान  परप्रांतीय कामगारांना त्याच्या राज्यात परतण्यासाठी केलेल्या नियोजनपूर्व कामगिरीबद्दल सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील एकमेव बस फोर अस फौंडेशनने त्यांना कोविड योद्धा म्हणून सन्मानित केले आहे.

कोरोना सारख्या भयंकर महामारीशी आज संपूर्ण देश लढत आहे. अशा काळात आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून समाजासाठी करीत असलेले सेवाकार्य अतुलनीय आहे. आम्हा सर्वांना आपला अभिमान आहे, असे सांगून बस फार अस फाउंडेशनने त्यांचा सन्मान केला.

सातारा MIDC मध्ये असणारे परप्रांतीय कामगार, मजूर कारागीर या लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. रोजगार नसल्याने सर्व मजूर आपआपल्या राज्यात जायला इच्छुक होते, मात्र टाळेबंदीमूळे वाहतूक व्यवस्था ठप्प असल्याने ते लोक हतबल झाले होते. दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाने सरकारी आदेशानुसार व नियमानुसार परप्रांतीय वाहतुकीस परवानगी दिली, त्यानंतर सातारा आगारामधून देशातील विविध राज्यात परप्रांतीय मजूरांना सुखरुप पोहोचवण्यात आले.

या कामामध्ये फलटणचे सुपुत्र असणार्‍या राहुल श्रीरंग शिंगाडे यांनी योग्य नियोजन करुन परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी सुखरुप पोहोचवले. याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!