दैनिक स्थैर्य । दि. २४ ऑगस्ट २०२२ । मुंबई । नवीन नियुक्ती ठप्प, कामावरून कमी करणे आणि निधीचा अभाव अशा कुप्रसिद्ध स्टार्टअप विंटरच्या अनेक त्रासदायक पैलूंनी भारतीय उद्योग परिसंस्था अनपेक्षितरित्या ठप्प केली आहे. या तात्पुरत्या, पण त्रासदायक टप्प्यामध्ये शाईन डॉटकॉम (Shine.com) या भारतातील दुस-या सर्वात मोठ्या जॉब पोर्टलने अद्वितीय उपक्रम ‘स्टार्टअप विंटर’चे अनावरण केले आहे. रिबूटवुईथशाईन उपक्रमाचा प्रभावित कर्मचार्यांना सहाय्यक व्यासपीठ प्रदान करण्याचा, या कठीण काळात नेव्हिगेट करण्यास मदत करण्याचा मनसुबा आहे. आम्ही या प्रयत्नात अनेक कंपन्यांसोबत त्यांचे आऊटप्लेसमेंट सहयोगी म्हणून सहयोग केला आहे, ज्यामुळे त्यांना प्रबळपणे साह्य करण्यासोबत आणखी रोजगार मिळण्यासाठी योग्य नियोक्तांशी संलग्न होण्यास मदत करता येईल.
शाईन डॉटकॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अखिल गुप्ता म्हणाले, “रिबूटवुईथशाईन उपक्रमाचा प्रभावित कर्मचा-यांसाठी सहाय्यक व्यासपीठ म्हणून सेवा देण्याचा आणि त्यांना या अवघड काळामधून बाहेर पडण्यास मदत करण्याचा मनसुबा आहे. खरेतर आम्ही या प्रयत्नामध्ये अनेक कंपन्यांसोबत त्यांचे आऊटप्लेसमेंट सहयोगी म्हणून सहयोग केला आहे, ज्यामुळे त्यांना प्रबळ पाठिंबा देण्यासोबत आणखी रोजगार मिळण्यासाठी योग्य नियोक्तांशी संलग्न होण्यास मदत करता येईल. या क्षेत्रातील जबाबदारकंपनी म्हणून आमचा रोजगार संधींचा शोध घेणा-या कर्मचा-यांसाठी परिपूर्ण रिक्रूटिंग सोबती बनण्याचा आणि लवकरात लवकर त्यांची स्थिती सुधारण्याचा मनसुबा आहे.”
शाईन डॉटकॉमच्या स्टार्टअप विंटर उपक्रमामध्ये नावनोंदणी करून उमेदवार विविध लाभ मिळवू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रोफाइल तयार केल्यानंतर त्यांना तत्काळ जॉइनर टॅग मिळतो. हे रिक्रूटर्सना त्यांची त्वरित उपलब्धता प्राप्त करून देईल आणि त्यांची प्रोफाइल दृश्यमानता वाढवेल. तसेच ते रिक्रूटरला दिसणा-या एका विशेष विभागाचा भाग असतील, जेथे उमेदवाराच्या भर्तीच्या कृती आणि नोकरी शॉर्टलिस्टिंगची शक्यता ७५ टक्क्यांपर्यंत वाढते.
तिसरे म्हणजे, उमेदवार संपूर्ण भारतातील ५० हजारांपेक्षा अधिक रिक्रूटर्सपर्यंत पोहोचू शकतील. सर्वात शेवटचे म्हणजे, उमेदवारांना वर्कबड सपोर्ट देखील मिळेल, ज्या अंतर्गत त्यांना रिक्रूटर कनेक्ट, जॉब मॅच आणि शॉर्टलिस्टद्वारे उपलब्ध/संबंधित नोकरीचे वर्णन, कौशल्ये व सिटी फिटमेंटनुसार वैयक्तिक सहाय्य मिळेल.
या प्रशंसनीय उपक्रमासह शाईन डॉटकॉमचे सर्व प्रभावित कर्मचा-यांसाठी परिपूर्ण रिक्रूटमेंट सोबती बनण्याचे आणि त्यांना शक्य तितक्या लवकर योग्य नोक-या मिळविण्यात मदत करण्याचे उद्दिष्ट आहे. कामावरून काढलेल्या कर्मचा-यांसाठी ही कठीण वेळ आहे आणि शाईन डॉटकॉम त्यांना परत कामावर रूजू होण्याच्या या संघर्षामध्ये यशस्वी होण्यास स्थिर साह्य प्रदान करत आहे.