दैनिक स्थैर्य | दि. २१ सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित, कृषी महाविद्यालय फलटण येथील अंतिम वर्षातील कृषीकन्यांमार्फत ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मठाचीवाडी येथे ‘शेतकरी दिन’ निमित्त ऊस पिक लागवड तंत्रज्ञान, सुपरकेन, शेतीशी संलग्न विविध बँक योजनांबद्दल मार्गदर्शन पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमादरम्यान कृषी महाविद्यालय फलटणचे प्रा. डॉ. वैभव गायकवाड यांनी ‘शाश्वत ऊस शेती, हुमणी आणि लोकरी मावा व्यवस्थापन’ याविषयी मार्गदर्शन केले. तसेच कृषी सहाय्यक श्री. दीपक बोडके सर यांनी ‘सुपरकेन’ या विषयावर आणि श्री. योगेश चव्हाण (विकास अधिकारी) यांनी बँकेशी संलग्न शेतीविषयक योजनांची माहिती दिली.
या कार्यक्रमावेळी मठाचीवाडी गावच्या सरपंच सौ. जयश्रीताई भोसले गावामधील प्रगतशील शेतकरी, ऊस बागायतदार, बँकेचे अधिकारी व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान ऊस शेती करताना शेतकर्यांना येणार्या अडचणींविषयी देखील प्रा. डॉ. वैभव गायकवाड यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीकन्या समृद्धी मोहिते, साक्षी शिंदे, हर्षदा लोखंडे, प्राजक्ता ननवरे, पूजा मारवाडी, शिवांजली धुमाळ, समृद्धी कुंजीर, समृद्धी उल्हारे या कृषीकन्यांना कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे व प्रा.नितिशा पंडित यांचे मार्गदर्शन लाभले.