शेरेचीवाडी ग्रामविकासाचे रोल मॉडेल ठरेल : अविनाश फडतरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ७ जुलै २०२१ । फलटण । ‘शेरेचीवाडी ग्रामपंचायत ही गावच्या विविध विकास कामांच्या पूर्ततेसाठी नियोजनबद्ध पाठपुरावा करत असून ग्रामपंचायतीने ग्रामविकासासाठी ठेवलेले व्हिजन व यासाठी ग्रामस्थांची असलेली एकजूट निश्‍चितपणे दिशादर्शक अशी आहे. शासन, प्रशासन व लोकसहभाग अशा सर्व मार्गांनी होत असलेल्या प्रयत्न व सहकार्यामुळे हे गाव निश्‍चितपणे भविष्यात ग्रामविकासाचे रोल मॉडेल ठरेल व त्यासाठी सातारा जिल्हा परिषदेमार्फत ही पूर्णतः सहकार्य केले जाईल’’, असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी केले.

शेरेचीवाडी ता. फलटण येथील ग्रामपंचायतीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खटाव पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष साळुंखे, पंचायत समिती सदस्य राहुल शिंदे, सरपंच दुर्गादेवी रविंद्र नलवडे, ग्रामपंचायत सदस्या राणी महेश चव्हाण, अभिजीत बाळासो मोहिते, शितल शिवाजी फडतरे, महेश हरिदास बिचुकले तसेच गावकामगार तलाठी विनायकराव गाडे, ग्रामसेविका मोनिका मुळीक, श्रीरंग चव्हाण, उज्वला गुरव, दिनकर चव्हाण, दिपक नलवडे, राहूल नलवडे, हंबीरराव मोहिते, लालासाहेब नलवडे, ज्योतिराम चव्हाण, स्नेहल मोहिते, संदीप शिंदे, दशरथ ढेंबरे, सचिन शिंदे ,संदीप पवार, सुकुमार नलवडे, मनोहर मोहिते, बाळासो ढवळे, अंकीत नलवडे, प्रतिक चव्हाण, सूरज नलवडे, सचिन मोहिते, दिलीप जगदाळे, दादासो रिटे, राम घाडगे, विठ्ठल माने, सुहास डांगे, संतोष मोहिते आदि अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हणमंतराव चव्हाण यांनी तर स्वागत संजय ढेंबरे यांनी केले. उपस्थितांचे आभार विक्रमसिंह नलवडे यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!