बेताल व्यक्तव्य करणाऱ्या शेखर गोरेंनी आपली राजकीय उंची तपासावी : विशाल पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२१ । फलटण । सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत चिट्ठीद्वारे निवडून आलेल्या नवनियुक्त संचालक शेखर गोरे यांनी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्याचा सर्वच स्तरातून तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे. जी व्यक्ती कोणत्याही पक्षाशी एकनिष्ठ राहू शकली नाही, अशा गुन्हेगारी स्वरूपाची पाश्वभूमी असणाऱ्या व्यक्तीने बेताल वक्तव्य करताना आपली राजकीय उंची तपासून पहावी, असे मत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष विशाल पवार यांनी व्यक्त केले.

गेली २५ वर्षे सहकार क्षेत्राचा गाढा अभ्यास असणाऱ्या व सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे भगीरथ समजल्या जाणाऱ्या श्रीमंत रामराजेंच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची प्रगती दिवसेंदिवस उंचावत आहे. त्यामुळेच देशात जिल्हा बँकेचा गौरव अग्रस्थानी आहे. सध्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे राज्याचे विधानपरिषदेचे सभापती आहेत. सातारा जिल्हा बँकेवर बिनविरोधपणे निवडून आलेले आहेत. शेखर गोरेंनी केलेले वक्तव्य म्हणजे राजकीयदृष्ट्या असभ्य, हीन व असंस्कृतपणाचे लक्षण आहे. मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या प्रवृत्तीला जिल्ह्यातील जनताच आगामी काळात हद्दपार करेल. त्यामुळे इथून पुढे नशिबाने मिळालेल्या संचालकपदाचा उपयोग त्यांनी शेतकऱ्यांच्या व सभासदांच्या हितासाठी करावा. तसेच राजकारण व समाजकारणात अनेक वर्षे घालवणाऱ्या मोठ्यापदावरील व जेष्ठ व्यक्तिविषयी बोलताना जिभेवर ताबा ठेवावा व वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी. अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, असे हि विशाल पवार यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!