
स्थैर्य, फलटण : भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या “भारतीय गुणवत्ता परिषदेच्या” सदस्यपदी आर.पी.जी ग्रुप, मुंबईचे संचालक शशिकांत कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. या पूर्वी गेली 11 वर्ष शशिकांत कांबळे हे भारती विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करत होते. ग्लोबल सोशल स्टडी अँड रिसर्च फौंडेशन पुणेचे ते अध्यक्ष आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरणच्या का रक्षण संदर्भात आणि भारतीय उत्पादनाच्या वाढी संदर्भात भारत सरकारची भारतीय गुणवत्ता परिषद कार्यरत असते. या निवडीबाबत शशिकांत कांबळे यांचे विविध स्तरांमधून अभिनंदन होत आहे.