फलटण तालुक्यात सर्वाधिक ऊसदर “शरयू”चा


दैनिक स्थैर्य | दि. 1 डिसेंबर 2023 | फलटण | फलटण तालुक्यामध्ये चार साखर कारखाने कार्यरत आहेत. चारही साखर कारखान्यांनी आत्ताच्या गळीत हंगामासाठी आपले ऊस दर जाहीर केले आहेत. त्यामध्ये कापशी येथील शरयू कारखान्याने तालुक्यात नव्हे तर सातारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ऊस दर म्हणजेच रुपये 3151 प्रतिटन दिला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून नक्की कोणता कारखाना किती ऊस दर जाहीर करणार याकडे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले होते सर्वप्रथम श्रीराम सहकारी साखर कारखान्याने रुपये 3051 प्रतिटन ऊस दर जाहीर केला. त्यानंतर साखरवाडी येथील दत्त इंडिया कारखान्याने रुपये 3051 प्रतिटन जाहीर केला. उपळवे येथील स्वराज साखर कारखान्याने रुपये 3101 प्रतिटन ऊसदर जाहीर केला तदनंतर “शरयू” कारखान्याने तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच रुपये 3151 दर जाहीर केला.


Back to top button
Don`t copy text!