दैनिक स्थैर्य । दि. १५ जानेवारी २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील कापाशी येथे असणाऱ्या शरयू ऍग्रो सर्व्हिसेसच्या साखर कारखान्याची सातारचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने अचानक तपासणी केली असता येथील वजन काटे हे अचूक व तंतोतंत वजन दर्शवित आहेत, असा निर्वाळा भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी दिलेला आहे, अशी माहिती शरयू उद्योग समूहाचे संचालक अविनाश भापकर यांनी दिली.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशाने शासकीय भरारी पथकामध्ये फलटणचे तहसीलदार समीर यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत वैध मापनशास्त्र निरीक्षक आर. पी. आखरे, विशेष लेखा परीक्षक ए. सी. शिरतोडे, फलटणचे पुरवठा निरीक्षक मनोज काकडे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी धनंजय महामूलकर, रविंद्र घाडगे, शकील मणेर, शरयुचे इन्स्ट्रुमेंट मॅनेजर सुखदेव खोबन, मुख्य शेतकी अधिकारी शरद देवकर, केन यार्ड सुपरवायझर तुषार चव्हाण यांच्यासह विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
शरयुने ४ लाख ९१ हजार मे. टन ऊसाचे गाळप केले असून गाळपात आघाडी घेतली आहे. शरयु साखर कारखान्याचे चेअरमन श्रीनिवास पवार (बापूसाहेब) यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी संचालक युगेंद्रदादा पवार यांच्या कुशल नेतृत्वाखाली यंदा १० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून शेतकऱ्यांनी आपला ऊस विश्वासाने शरयुला द्यावा असे आवाहन सुद्धा संचालक भापकर यांनी केलेले आहे.