गिरवीच्या शर्वरी जाधवची कुस्तीत जिल्हास्तरावर बाजी; विभागीय स्पर्धेसाठी निवड


स्थैर्य, फलटण, दि. ४ ऑक्टोबर : ढवळ पाटी येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत गिरवी येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी शर्वरी भास्कर जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिने १९ वर्षांखालील ६५ किलो वजन गटात फ्री स्टाइल कुस्तीमध्ये हे यश मिळवले असून, तिची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या यशाबद्दल जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सह्याद्री कदम, संस्थापक सचिव व जिल्हा परिषदेच्या माजी सभापती शारदादेवी कदम, एकता क्रांती दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी तिचे अभिनंदन केले.

तसेच शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, गटविकास अधिकारी सतीश कुंभार, गटशिक्षणाधिकारी अनिल सपकाळ, केंद्रप्रमुख राजश्री कुंभार, सरपंच वैशाली कदम, उपसरपंच संतोष मदने, विद्यालयाचे प्राचार्य संजयकुमार सावंत आणि क्रीडा शिक्षक व मार्गदर्शक हिंदुराव लोखंडे यांनीही शर्वरीचे कौतुक करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!