नामांतर मुद्द्यावर शरद पवार यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.१७ : औरंगाबादच्या नामांतरावरून (Renaming Aurangabad) महाविकास आघाडीत एकमत नसताना, विशेषत: शिवसेना आणि काँग्रेसची भूमिका वेगवेगळी असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मात्र या विषयावर वेगळेच भाष्य केले आहे. आमच्यात वाद नसून संभाजीनगर म्हणा, धाराशिव म्हणा नाहीतर आणखी काही म्हणा, या प्रकरणाकडे मी गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे या विषयावर मी कधीही भाष्य केलेले नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला होता. त्यानंतर त्यावरून नवा वाद निर्माण झाला होता. हा वाद सुरू असतानाच आता उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव असा करण्यात आल्याने या वादात भर पडली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवर संभाजीनगर असा उल्लेख झाल्याबाबत मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्नही विचारले. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, ‘मी त्यात नवीन असे काय केले?, मी जे वर्षानुवर्षे बोलत आलेलो आहे तेच केले आहे आणि तेच स्वीकारणार.’

या वेळी मुख्यमंत्र्यांना काँग्रेस पक्षाच्या नाराजीबाबतही विचारण्या आले. त्यावर औरंगजेब हा काही धर्मनिरपेक्ष नव्हता. त्यामुळे आमच्या अजेंड्यात असलेला धर्मनिरपेक्ष हा शब्दात औरंगजेब बसत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

औरंगाबादच्या नामांतराबाबत काँग्रेस पक्षाची भूमिका कायम आहे. आम्ही ती वेळोवेळी मांडलेली देखील आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आम्ही आमची भूमिका मुख्यमंत्र्यांना निश्चित पटवून देऊ, असे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले. या विषयात औरंगजेब हा मुद्दा नाही. छत्रपती संभाजी महाराज हे आमचेही आराध्यदैवत आणि श्रद्धास्थान आहे. नामांतराच्या बाबतीत जे राजकारण होते, त्यामुळे माणसात भेद निर्माण होतात. ते होऊ नये यासाठी काँग्रेस पक्षाचा विरोध आहे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे.


Back to top button
Don`t copy text!