शरद पवार, उद्धव ठाकरेंची बदनामी, कऱ्हाडात अमरावतीच्या दोघांवर गुन्हा


 

स्थैर्य, कऱ्हाड, दि.४: सोशल माध्यमावर महाविकास आघाडी सरकारसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी केल्याप्रकरणी दोघांवर तालुका पोलिसात सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल झाला. विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक अक्षय शिंदे यांनी त्याची तक्रार दिली आहे. 

आकाश ठाकूर (रा. अमरावती) व रणजीतसिंग राणा अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तालुक्यातील सुपने येथील अक्षय शिंदे राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेचे जिल्हा संघटक आहेत. सचिन कुर्‍हाडे पक्षाच्या सोशल माध्यम सेलचे जिल्ह्याचे काम पाहतात. सोशल माध्यमावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारची बदनामी होईल, अशा आशयाच्या पोस्ट व फोटो 12, 15, 16 आणि 19 ऑक्टोबर रोजी टाकले होते. अक्षय यांच्या ते निदर्शनास आले. 

त्यांनी राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष सचिन कुर्‍हाडे यांच्याकडून माहिती घेतली. संबंधित सोशल माध्यमाचा ग्रुप अमरावतीच्या आकाश ठाकूर (रा. अमरावती) यांनी केला आहे, असे स्पष्ट झाले. त्याबाबत अक्षय शिंदे यांनी आकाश ठाकूर व रणजीतसिंग राणा यांच्याविरोधात तालुका पोलिसात तक्रार दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार गणेश कड तपास करीत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!