विजयदादांना श्रेय जाऊ नये म्हणून शरद पवारांनी कृष्णा – भीमा स्थिरीकरण प्रकल्प रखडवला : खासदार रणजितसिंह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १४ जुलै २०२३ | फलटण | मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रामधील दुष्काळी भागाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला कृष्णा – भीमा स्थिरीकरण या प्रकल्पाचे संपूर्ण श्रेय हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील यांचेच आहे. विजयसिंह मोहिते – पाटील यांना श्रेय जाऊ नये; म्हणूनच शरद पवार यांनी एवढी वर्ष कृष्णा भीमा स्थिरीकरण हा प्रकल्प रखडवला होता; असा घणाघाती आरोप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला.

यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह म्हणाले की, कृष्णा – भीमा स्थिरीकरण या प्रकल्पामध्ये काही सुधारणा करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हा प्रकल्प पुन्हा पुढे नेलेला आहे. कृष्णा – भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचे संपूर्ण श्रेय हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनाच जाते; या प्रकल्पासाठी विजयसिंह मोहिते – पाटील यांचे असलेले योगदान कधीही विसरता येणार नाही.


Back to top button
Don`t copy text!