नेत्र तपासणी करताना डॉ. शरद शिंदे शेजारी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, डी. के. पवार, सौ. रेखाताई खरात, शंकरराव माडकर, नितीन भोसले वगैरे.
स्थैर्य, फलटण दि. १४ : सलग ५० वर्षांच्या प्रदीर्घ समाजकारण व राजकारणात सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक व त्यांना दिलासा देण्यालाच खा. शरदराव पवार यांनी प्राधान्य दिल्याचे नमूद करीत समाजातील सर्व घटकांच्या समस्यांची जाण व त्यांची सोडवणूक करण्याची क्षमता असणारा हा नेता वयाच्या ८० व्या वर्षीही त्याच तडफेने कार्यरत असल्याचे नमूद करीत महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी खा. शरदराव पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या.
एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, पुणे यांच्या सहकार्याने साखरवाडी प्रा. आरोग्य केंद्र येथे मातोश्री विकास सोसायटी व कै. शेवंताबाई पवार वाचनालय/ग्रंथालय यांच्या माध्यमातून महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी खा. शरदराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित मोफत नेत्र तपासणी, मोती बिंदू नेत्र शस्त्रक्रिया व चष्मे वाटप उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी विशेष अतिथी म्हणून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते, अध्यक्षस्थानी डी. के. पवार होते. यावेळी श्रीरामचे व्हा. चेअरमन नितीन भोसले, संचालक रमेश बोंद्रे, उपसभापती सौ. रेखाताई खरात, महादेव संकपाळ, सागर कांबळे, प्रा. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोडमिसे, संतोष शेडगे, सचिन फडतरे, हाजीभाई शेख, श्रीकांत भोसले, हभप प्रकाश महाराज पवार, हभप रणवरे महाराज, दूध संघाचे संचालक सुनील माने, तानाजी माने, संग्राम पवार, एच.व्ही. देसाई रुग्णालयाचे डॉ. शरद शिंदे, अभिजित बर्गे, संतोष बोडके, अविनाश आडके यांच्यासह नेत्र रुग्ण आणि साखरवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार व त्यांचे सहकारी प्रतिवर्षी आदरणीय पवार साहेबांचे वाढदिवसानिमित्त मोफत मोती बिंदू नेत्र शस्त्रक्रिया, नेत्र तपासणी व नंबरचे चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करुन अंधत्व निवारणाचे कामात अग्रेसर असल्याबद्दल त्यांना धन्यवाद देत हा उपक्रम पवार साहेबांच्या शताब्दी वर्षापर्यंत अखंडित सुरु ठेवण्याचे आवाहन श्रीमंत संजीवराजे यांनी केले.
गेल्या २० वर्षांपासून खा. शरदराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम अखंडित राबवित असून आतापर्यंत ५ हजार मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया मोफत केल्या आहेत, असंख्य नेत्र रुग्णांची तपासणी, अनेकांना नंबरचे चष्मे मोफत वितरीत केले आहेत. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहिरात न करता साखरवाडी परिसरातून नेत्र रुग्णांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन शासनाच्या नियम, निकषानुसार सोशल डिस्टनसिंग, मास्क व सॅनिटायझर वापर करण्यात आल्याचे डी. के. पवार यांनी अध्यक्षीय भाषणात स्पष्ट केले.
प्रारंभी तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष दशरथ जाधव यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात खा. शरदराव पवार यांना ८० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्यानंतर शिबीराविषयी विवेचन केले. शेवटी समारोप व आभार प्रदर्शन माजी सभापती शंकरराव माडकर यांनी केले.