दैनिक स्थैर्य | दि. 25 फेब्रुवारी 2024 | फलटण | आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघांमधून सुप्रिया सुळे भरघोस मतांनी विजयी झाली पाहिजे; असे मत ज्येष्ठ नेते सुभाष शिंदे यांनी शरद पवार यांच्या जवळ व्यक्त केले. त्यावर शरद पवार सुद्धा भाऊक होत “लवकर बरे व्हा; तुम्हाला आपल्या उमेदवाराचा फलटण तालुक्यात प्रचार करायचा आहे !” असेही यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले.
गत काही दिवसांपूर्वी फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांच्यावर पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक मध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार हे स्वतः रुबी हॉल क्लिनिक येथे गेले होते. यावेळी माजी आमदार बापूसाहेब पठारे, फलटण बाजार समितीचे संचालक चेतन शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे नंदकुमार मोरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुभाष शिंदे यांच्या प्रकृतीची आस्थापूर्वक चौकशी केली. त्याबाबत रुबी हॉल क्लिनिक येथील वरिष्ठ डॉक्टरांची सुद्धा चर्चा केली.