दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२१ । फलटण । शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदी सौ. शीला मोहिते यांची नुकतीच निवड करण्यात आलेली आहे. निवडीबाबतचे नियुक्तीपत्र संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल पवार यांनी सौ. मोहिते यांच्याकडे सुपूर्त केले.
शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना व राष्ट्रीय किसान संघटना, नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये सोळा राज्यामध्ये कार्यरत असलेल्या शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी बळकट करण्यासाठी सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील येथील सौ. शीला चंद्रकांत मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते अशोक बालगुडे यांनी दिली.
सौ. शिला मोहिते या सहकार, कामगार, सामाजिक क्षेत्रामधील अभ्यासू व सामाजिक कार्यकर्त्या असून त्या शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्या सभासद आहेत. सौ. मोहिते यांचा सहकार, कामगार, सामाजिक क्षेत्रातील कामाचा दीर्घ अनुभव व संघटनेमध्ये नव्याने जाहीर होत असलेल्या कार्यकारणी मध्ये त्यांची सदस्य म्हणून प्राथमिक निवड करण्यात आलेली होती. सौ. मोहिते यांना संघटनेचा बिल्ला व प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडी बाबतचे पत्र संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार (राजे) यांच्या हस्ते देण्यात आले.
महीला आघाडी अध्यक्षा म्हणून सौ. शिला मोहिते यांचे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व पदाधिकारी यांनी स्वागत केले. तर संघटनेच्या १२०० हून अधिक ग्रुप वर ही मोठ्या संख्येने स्वागत करण्यात आलेले आहे.