
स्थैर्य, फलटण, दि. ०९ सप्टेंबर : फलटण येथील सगुणा माता नगर, जिंती नाका येथील रहिवासी शांताराम विष्णू इनामके (वय ८४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांनी साखर कारखान्यामध्ये सेवा बजावली होती. निवृत्तीनंतर ते सामाजिक कार्यात आणि परिसरातील शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शनामध्ये सक्रिय होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
ते डॉ. चंद्रकांत शांताराम इनामके यांचे वडील होत.