दैनिक स्थैर्य | दि. २६ डिसेंबर २०२४ | फलटण |
फलटण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव, अभ्यासक शंकरराव सोनवलकर यांनी भारत सरकारच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅग्रीकल्चर एक्स्टेंशन मॅनेजमेंट’, हैद्राबाद येथून ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्रीकल्चर एक्स्टेंशन मॅनेजमेंट (PGDAEM) या अभ्यासक्रमात ६८० पैकी ५३१ गुण मिळवून मोठे यश प्राप्त केले आहे.
या यशाबद्दल सोनवलकर यांचे फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्यासह बाजार समितीचे इतर संचालक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.