दैनिक स्थैर्य । दि. २३ ऑगस्ट २०२२ । फलटण । गोविंदा आला रे गोपाळा…! च्या जयघोषात फलटण येथील शंकर मार्केट दहिहंडी उत्सव समितीचे अध्यक्ष किशोरसिंह नाईक निंबाळकर यांनी आयोजित केलेला दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी बारामती तालुक्यातील गुणवडी येथील दहीहंडी पथकाने दहीहंडी फोडून आपला विजय याठिकाणी नोंदवला.
यंदा कोरोनानंतर दोन वर्षांनी दहीहंडी होणार असल्याने गोविंदामध्ये मोठा जल्लोष बघायला मिळत होता. दोन वर्ष कोरोनामुळे अनेकांनी निर्बंधासह दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला नव्हता. मात्र यावर्षी फलटण शहरात गोविंदाचा उत्साह ओसंडून वाहत होता. फलटणमध्ये अनेक चौकामध्ये दहीहंडींचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती तथा युवा नेते श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते या दहीहंडी उत्सवाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, माजी उपनगराध्यक्ष नितीन (भैय्या) भोसले, फलटण नगर परिषदेच्या माजी नगरसेविका सौ. प्रगती कापसे सौ दिपाली निंबाळकर, सौ. वैशाली चोरमले, दादासाहेब चोरमले, प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक तुषार नाईक निंबाळकर, नगरसेवक बाळासाहेब मेटकरी, रामराजे युवा मंच अध्यक्ष राहुल निंबाळकर, नगरसेवक सनी अहिवळे, भाऊसोा कापसे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.