दैनिक स्थैर्य | दि. १७ ऑक्टोबर २०२१ | मुंबई | भारतात दिवे, पंखे, होम अप्लायन्सेस, स्टील पाइप्स आणि पीव्हीसी पाइप्ससाठीचा सर्वात प्रतिष्ठित आणि विश्वसनीय ब्रॅंड सूर्या रोशनीने ‘सूर्या सबको मूड में ले आये’ या थीमवर आधारित एक नवीन अॅड कॅम्पेन आणले आहे. प्रसिद्ध भारतीय गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांना दर्शविणारे हे कॅम्पेन सूर्याच्या सध्या सुरू असलेल्या ब्रॅंड रिफ्रेशचा एक भाग आहे.
या अत्यंत व्यस्त आणि धकाधकीच्या जगात हे कॅम्पेन कुटुंबांना एकत्र येण्यासाठी आग्रह करते आणि एका आकर्षक गोष्टीतून आणि शंकर महादेवनच्या सुमधुर गीताच्या माध्यमातून सूर्याच्या महत्त्वाच्या कन्झ्युमर उत्पादनांची अनोखी फीचर्स आणि त्यांचे लाभ हायलाइट करते.
या कॅम्पेनमध्ये सूर्याचे स्मार्ट लाइटिंग आणि लो नॉइज मिक्सर ग्राइंडर्स अशा दोन टेलिव्हीजन जाहिरातींचा समावेश आहे. हे कॅम्पेन ऑक्टोबरमध्ये लॉन्च झाले असून टेलिव्हिजन, प्रिंट आणि डिजिटल मीडिया मंचांवर चालत राहील.
पहिल्या, सूर्या स्मार्ट लाइटिंगसाठीच्या जाहिरातीत शंकर महादेवन कामावरून घरी येतो आणि पाहतो की, प्रत्येक जण आपापल्या कामात गुंतलेला आहे. हे चित्र पाहून तिला उद्विग्न वाटते. हे लक्षात येऊन, त्याचा मूड आणण्यासाठी त्याची पत्नी सूर्या स्मार्ट डाउनलाइटर्स सुरू करते. ते सुरू होताच शंकरला गाणे स्फुरते, “मूड ऐसा बदल गया, माहोल घर का चमक गया”. हे सुर कानावर पडताच घरातील इतर मंडळी आपल्या हातातील काम टाकून एकत्र येतात. सूर्या स्मार्ट डाउनलाइटर्सची वेगवेगळी फीचर्स, जशी की, रिमोट कंट्रोल द्वारे नियंत्रण, बदलते रंग, प्रकाशाची तीव्रता बदलणे, वगैरे हायलाइट केली जातात ज्याच्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा मूड मस्त होऊन जातो.
दुस-या, सूर्या मिक्सर ग्राइंडर्सच्या जाहिरातीत महादेवनला आपल्या मुलांसोबत स्वयंपाकघरात दाखवले आहे. जेव्हा त्यांना मिक्सर ग्राइंडर सुरू करायचा असतो, त्याच क्षणी ते मोठमोठ्याने गाणे म्हणू लागतात, या अपेक्षेने की, त्या उपकरणाचा खूप मोठा आवाज येईल. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ते मिक्सर ग्राइंडर अगदीच कमी आवाज करते आणि ते फारसे कंपही पावत नाही.
श्री. निरूपम सहाय ईडी आणि सीईओ, लाइटनिंग आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स, सूर्या रोशनी म्हणाले की, “सूर्यामध्ये आम्ही आमच्या उपभोक्त्यांना नेहमी सर्वात पुढे मानतो आणि आधुनिक आणि प्रगतीवादी उपभोक्त्याच्या आकांक्षा पूर्ण करणारी उत्पादने बनवतो. आमच्या नवीन अॅड कॅम्पेनसाठी शंकर महादेवनला घेणे या एक चांगला निर्णय होता, कारण त्याने आपल्या गाण्याने आणि अभिनय कौशल्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि त्यात एका आधुनिक, इनोव्हेटिव्ह, प्रगतीवादी आणि स्टायलिश ब्रॅंड म्हणून स्वतःला सादर करण्याचे आमचे व्हिजन छान पकडले आहे.”