समशेरदादा उद्या स्वीकारणार नगराध्यक्षपदाचा पदभार


माजी खासदार रणजितसिंह आणि आमदार सचिन पाटील यांच्या उपस्थितीत पार पडणार कार्यक्रम; सकाळी ९:४५ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन.

स्थैर्य, फलटण, दि. २८ डिसेंबर : फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष समशेरसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांचा अधिकृत पदग्रहण समारंभ उद्या, सोमवार दि. २९ डिसेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. फलटण नगरपरिषद कार्यालयात हा सोहळा पार पडणार आहे.

दिग्गजांची असणार उपस्थिती

या पदग्रहण सोहळ्यासाठी फलटण तालुक्यातील महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्षा सौ. प्रतिभाताई शिंदे, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर, युवा नेत्या सौ. मनिषाताई नाईक निंबाळकर आणि ऐश्वर्याराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांचे सर्व मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी सकाळी ०९:४५ वाजता नगरपरिषद कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!