दैनिक स्थैर्य । दि. ९ मे २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील पूर्व भागातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या आंदरूड विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी शंभूराज विनायकराव पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे. त्याबाबत शंभूराज पाटील यांच्यावर फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, आंदरूड विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. त्यामध्ये विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक बिनविरोध पार पडली.
आंदरूड विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शंभूराज विनायकराव पाटील तर व्हाईस चेअरमनपदी आबासो वामन राऊत यांची निवड करण्यात आलेली आहे. सदर निवडीच्यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
आंदरूड विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शंभूराज विनायकराव पाटील तर व्हाईस चेअरमनपदी आबासो वामन राऊत यांची निवड झाली असून नूतन संचालक मंडळामध्ये नारायण बाबुराव कर्णे, जोतिराम वाघ, शांतीनाथ बेलदार, चांगदेव राऊत, महादेव कुंभार, आनंदा राऊत, विलास जाधव, बापू मसुगडे, शारदा कर्णे, सीमा राऊत यांचा समावेश आहे.