स्थैर्य, सातारा, दि. 29 : कोरोना विषाणूच्या संसर्गात वाढ होऊ नये यासाठी मा.जिल्हाधिकारी सो. सातारा यांनी सातारा जिल्ह्यात साथरोग प्रतिबंध कायदा 1987 हा लागू केलेला आहे. तसेच तात्काळ नियंत्रण करण्यासाठी मा.जिल्हा दंडाधिकारी कार्यालय सातारा यांच्याकडील आदेश क्रं.नै. आ./कावि /1282/2020 दि.27/05/2020 तसेच मा.जिल्हादंडाधिकारी कार्यालय, सातारा क्र.डि एम. यु/2020/CR92/DISM1दि. 19/5/2020 अन्वये सातारा जिल्ह्यातील सि आर पि सी 144 प्रमाणे संचारबंदी केली आहे.
तसेच सातारा शहरात काही अटींवर सर्व सलून दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. या मध्ये ग्राहकांसाठी आणि सलुनधारकांसाठी सोशल डिस्टन्स पाळणे, ग्राहकांची नोंद ठेवणे,केस कापणाऱ्या कारागिराने संरक्षण किट परिधान करणे हे बंधनकारक केले आहे.
तरीही सातारा शहरातील राजवाडा परिसरात गोलबागेजवळ जाधव कटिंग हेअर ड्रेसर्स आणि शेजारील दोन दुकाने येथे ग्राहकांची गर्दी झालेली होती आणि कोणत्याही अटींचे पालन न करता दुकाने चालु करून मा. जिल्हाधिकारी सो. यांच्या आदेशाचा भंग करून संसर्ग पसरविण्याचे कृत्य केल्याबद्दल अशोक रामचंद्र सूर्यवंशी रा.केसरकर पेठ सातारा, पांडुरंग शिवाजी दळवी रा.जकातवाडी,सातारा, नवनाथ जगन्नाथ कदम रा.समर्थ मंदिर, सातारा यांच्या विरुद्ध भा.दं.वि.स. 188, 269 व आप्पती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51(ब ), आणि महाराष्ट्र कोविड 19अधिनियम 2020 चे कलम 11प्रमाणे गुन्हा नोंद झालेला आहे. सदरबाबत सपोनि विशाल वाईकर, पो.शि.राहुल चव्हाण,होमगार्ड सकुंडे यांनी ही कारवाई केली.