
76 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
स्थैर्य, सातारा, दि. 14 : लॉकडाऊन काळात सातारा शहरात घरफोड्या करणार्या चार अट्टल चोरट्यांना शाहुपरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने जेरबंद केले आहे. सागर नागराज गोसावी वय 22, रवी निलकंठ घाडगे दोघे रा. सैदापुर, सातारा, मलिंगा उर्फ विपूल तानाजी नलवडे रा. करंजे, ता. सातारा, गबर्या उर्फ अक्षय रंगनाथ लोखंडे रा. जाधव रा. जाधव चाळीच्या मागे, सैदापूर, सातारा अशी संशयीतांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, सातारा शहर व परिसरात लॉकडाऊन काळात चोर्या व घरफोड्यांना ऊत आला होता. याबाबत सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल वायकर व गुन्हे प्रकटीकरण शाखेस चोरट्यांचा बंदोबस्त करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार सपोनि वायकर यांच्या सुचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक चोरट्यांचा शोध घेत होते. यावेळी संबंधित चोरटे त्यांच्या राहत्या घरी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेने संशयीतांच्या घराच्या परिसरातच सापळा रचून चारही आरोपींना जेरबंद केले. त्यांच्याकडे चौकशी केली असता तामजाई नगर येथील घरफोडीतील चोरुन नेलेला 5 हजार किंमतीचा पॅनासोनिक कंपनीचा एलईडी टिव्ही चोरल्याची तसेच मोळाचा ओढा परिसरातील निकीबंट्स हॉटेल फोडून बारमधील विदेशी दारुच्या बाटल्या चोल्याची कबुली दिली. चोरट्यांकडून 5 हजारांचा एल.ई.डी.टिव्ही निकीबंट्स हॉटेल बारमधील 71 हजार 440 रुपयांच्या विदेशी दारु बाटल्या असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
हवालदार दिलीप कदम तपास करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, हवालदार हसन तडवी, पो.ना. लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, मोहन पवार, पंकज मोहिते, मनोहर वाघमळे यांनी केली आहे.