स्थैर्य, सातारा, दि.११: सातारा जिल्ह्यातून हद्दपार केले असतानाही सातारा शहर परिसरात अस्तित्व लपवून राहत असलेल्या तीन गुंडांना शाहूपुरी पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे. अक्षय रंगनाथ लोखंडे रा. सैदापूर, विपुल तानाजी नलवडे रा. सातारा आणि दत्तात्रेय उत्तम घाडगे रा. सूर्यवंशी कॉलनी दौलतनगर सातारा अशी तिघांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर असललेल्या 12 गुंडाना पोलीस अधीक्षक व उपविभागीय दंडाधिकारी यांनी सातारा जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. या हद्दपार गुन्हेगारांवर लक्ष ठेवून ते हद्दीत मिळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील व सहा. पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांना दिलेल्या होत्या. दरम्यान, लॉकडाऊनचा गैरफायदा घेवून हद्दपार गुंड अवैधरित्या सातारा शहरात येवून त्यांच्या घराच्या परिसरात वावरत असल्याच्या तक्रारी नागरीकांकडुन पोलीस निरीक्षक संजय पंतगे यांना आल्या. यानंतर दि. 9 रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी पेट्रोलींग करत असताना रेकॉर्डवरील तीन तडीपार गुंड त्यांच्या घराच्या परिसरात अस्तित्व लपवून राहत आहेत, अशी माहिती मिळाली. त्याअनुषंगाने पोनि संजय पतंगे व गुन्हे शाखेच्या पथकाने कंरजे, दौलतनगर व गडकरआळी परिसरात रात्री उशीर छापे टाकुन तीन हद्दपार गुंडाना ताब्यात घेतले. त्यांच्यावर शाहुपूरी पोलीस ठाण्यात हद्दपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
ही कारवाई अजयकुमार बन्सल पोलीस अधिक्षक , सातारा , मा.धिरज पाटील अपर पोलीस अधिक्षक, श्रीमती आंचल दलाल सहा.पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली , पोलीस निरीक्षक संजय पतंगे , पो.हेड.कॉ. हसन तडवी, पो. ना. लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, पो. कॉ. मोहन पवार, पंकज मोहिते, ओंकार यादव चालक तुषार पांढरपट्टे यांनी केली आहे.