शाहूपुरी ग्रामपंचायती कडून नागरिकांना कोरोना संसर्गापासून सतर्क राहण्याचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, 23 : मुंबईवरून प्रवास करून आलेले शाहूपुरी हद्दीतील एक पुरुष आणि महिला हे दोन्ही कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहेत.

घटनास्थळी पंचायत समिती सदस्य संजय पाटील, बीडीओ संजय ढमाळ, ग्रामविकास अधिकारी मोहन कोळी, , सरपंच गणेश आर्डे, उपसरपंच राजेंद्र गिरी गोसावी, माजी उपसरपंच रमेश धुमाळ, शाहूपुरी पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल वाईकर, धनंजय कुंभार व इतर सहकारी आणि शाहूपुरी ग्रामपंचायतीचे आरोग्य कर्मचारी दाखल झाले होते. योग्य त्या सूचना देऊन शासनाच्या निकषांनुसार सर्व परिसर सील करण्यात आला आहे योग्य ती खबरदारी घेऊन सर्व परिसर निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

ग्रामपंचायतीकडून सर्व रहिवाशांना आवाहन करण्यात येत आहे कि कोणीही बाहेरील जिल्ह्यातील व्यक्ती शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीतील परिसरात दाखल झाल्यास सर्व प्रथम ग्रामपंचायतीकडे याची माहिती कळविण्यात यावी आणि यासाठी 02162253053 या ग्रामपंचायतीच्या क्रमांकावर संपर्क साधावा. संबंधित व्यक्तीने शासनाच्या विलगीकरण कक्षात राहून मगच रहिवासाच्या ठिकाणी येऊन ग्रामपंचायतीस सहकार्य करावे.

शाहूपुरीवासियांनो घाबरु नका परंतु,… काळजी घ्या

या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर शाहूपुरी परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, हे कोरोनाचे संकट जरी अगदी आपल्या शाहूपुरी भागात आले असले तरीही स्थानिक नागरिकांनी विशेषतः पेढ्याचा भैरोबा पायथा लगतच्या सोसायटी परिसरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये.कारण , कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झालेले हे रुग्ण काही दिवसांपूर्वी परगावहून आलेले आहेत.ते स्थानिक नाहीत.तसेच लगतच्या रहिवाशांच्या लक्षात ही बाब आल्यावर त्यांनी शासकीय यंत्रणेला त्वरीत याची कल्पना दिल्याने या सर्व बाहेरून आलेल्या व्यक्तींना होमक्वारंटाईन करण्यात आले होते.खरं तर प्रशासनास माहिती देऊन आपले कर्तव्य चोख बजावणारे हे सर्व जागरूक नागरिक अभिनंदनास पात्र आहेत.

तरीही, परिसरातील सर्व नागरिकांनी विशेषतः शासकीय यंत्रणेमार्फत प्रतिबंधित करण्यात येणाऱ्या क्षेत्रातील नागरिकांनी कोरोना संबंधिच्या सर्व शासकीय आदेशांचे तंतोतंत पालन करुन स्वत:चे व आपल्या शाहूपुरीचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी सहकार्य करावे ही विनंती.

तसेच, या निर्माण झालेल्या प्राप्त परिस्थितीत महसूल, सातारा तालुका पंचायत समिती, कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी संबंधित क्षेत्रास प्रत्यक्ष भेट देऊन सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन शाहूपुरी ग्रामपंचायत प्रशासनाशी योग्य त्या उपाययोजनांबाबत चर्चा केली आहे.

त्यामुळे आपणास पुन्हा एकदा विनंती की आपण घाबरून न जाता शासकीय आदेशाचे पालन करून स्वत:ची व आपल्या शाहूपुरीची काळजी घ्यावी. तसेच यापुढील काळातही परगावहून आलेल्या व्यक्तींची माहिती नागरिकांनी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनास त्वरीत द्यावी व आपले घर सद्यस्थितीत बाहेरील कोणासही भाड्याने देऊ नये.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!