
दैनिक स्थैर्य । दि. ०१ डिसेंबर २०२२ । सातारा । अण्णासाहेब कल्याणी शाळेची दिव्यांग विद्यार्थीनी शाहीर पियुषी भोसले ने शिवप्रताप दिनाचा पोवाडा किल्ले प्रतापगडावर मुख्य समांरभापूर्वी मान्यवरांसमोर सादर करुन मंत्रमुग्ध केले. पियुषीने दिव्यांगावर मात करत पोवाडा कलेत प्राविण्य मिळविले आहे. शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात तिने सादर केलेल्या रोमहर्षक, भारदस्त
पोवाड्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिचे कौतुक करून विशेष सत्कार केला. तसेच मुख्यमंत्री महोदयांनी तिला स्वतः रोख बक्षीस देऊन कौतुक केले.