शहाजीराजे गोडसे व विजय शिंदे यांचे वडूज पोलीसांविरोधातले उपोषण स्थगित


दैनिक स्थैर्य । दि.३० जून २०२१ । खटाव । वडूज पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाईच्या मागणीसाठी मंगळवार, दि.29 जून पासून करण्यात येणारे उपोषण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.निलेश देशमुख यांच्या आवाहनानंतर स्थगित करण्यात आले असल्याची माहिती, नगरसेवक शहाजीराजे गोडसे व विजय शिंदे यांनी दिली.

वडूज पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी होवून त्यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी वडूज नगरपंचायतीचे नगरसेवक शहाजीराव गोडसे व विजय शिंदे यांनी दिलेल्या निवेदनानुसार संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांची सखोल चौकशी करुन त्याबाबतचा अहवाल पोलीस अधिक्षक, सातारा यांच्याकडे पाठविण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित निवेदनानुसार करण्यात येणारे उपोषण स्थगित करणारे उपोषण एक महिन्यांकरिता स्थगित करण्यात यावे, असे पत्र वडूज उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.निलेश देशमुख यांनी दिल्यानंतर सदरचे उपोषण स्थगित करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!