शॅडोफॅक्सची रस्ता सुरक्षा मोहीम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ जून २०२२ । मुंबई । राइडरच्या सुरक्षिततेची खात्री घेण्याप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ करत शॅडोफॅक्स या भारतातील सर्वात मोठ्या ऑन-डिमांड तंत्रज्ञान-सक्षम लास्ट-माइल ३पीएल व्यासपीठाने मुंबईमध्ये रस्ता सुरक्षा मोहिमेचे आयोजन केले.

मुंबई वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शॅडोफॅक्सच्या राइडर्सना सेफ्टी किट्स मिळाले आणि त्‍यांनी सहार वाहतूक विभागाचे उप-निरीक्षक शिवाजी भनवलकर यांनी घेतलेल्या रस्ता सुरक्षा प्रशिक्षण सत्रामध्ये सहभाग घेतला. आरटीओ कायद्यांनुसार विशेषत: बाइक राइडर्ससाठी रस्ता सुर‍क्षेवर पूर्णत: लक्ष केंद्रित करण्यात आले.

शॅडोफॅक्सकडून भारतभरात राबवण्यात येणारी रस्ता सुरक्षा मोहीम त्यांचे डिलिव्हरी सहयोगी आनंदी असण्यासोबत ऑर्डर्स देताना सुरक्षित देखील असण्याची खात्री घेण्याप्रती त्यांच्या कटिबद्धतेचे विस्तारीकरण आहे. मागील दोन वर्षे व्हर्च्युअल मीट-अप्सच्या शृंखलेनंतर प्रत्यक्षात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला ३०० राइडर्सच्या उपस्थितीसह प्रचंड यश मिळाले.

शॅडोफॅक्सचे सह-संस्थापक व सीओओ प्रहर्ष चंद्रा म्हणाले, “आम्ही नेहमीच डिलिव्हरी सहयोगींच्या सुरक्षिततेला अधिक प्राधान्य दिले आहे. आमचे डिलिव्हरी सहयोगी व्यवसाय कार्यसंचालनांचे महत्त्वपूर्ण भाग आहेत. आम्‍हाला मुंबईमधून विविध शहरांमधील आमच्या डिलिव्हरी सहयोगींसाठी रस्ता सुरक्षा प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्याचा आनंद आहे. आम्ही हा इव्हेण्ट भव्य यशस्वी करण्यामध्ये मदत करणारे मुंबई वाहतूक पोलिस यांचे आभार मानतो. आमचे डिलिव्हरी सहयोगी ग्राहकांना शिपमेंट्स डिलिव्हर करताना त्यांच्या सुरक्षिततेला अधिक प्राधान्य देतील याची खात्री घेण्यासाठी शॅडोफॅक्स, अनेक शहरांमध्ये असे रस्ता सुरक्षा प्रशिक्षण उपक्रमांचे आयोजन करत राहील.”


Back to top button
Don`t copy text!