दैनिक स्थैर्य । दि. ०४ जुलै २०२२ । मुंबई । तामिळनाडूमध्ये ५,००० वितरण भागिदारांसाठी नोकऱ्या निर्माण करण्याची योजना जाहीरकेल्यानंतर, भारतातील सर्वात मोठ्या हायपरलोकल, क्राउडसोर्स लॉजिस्टिक प्लॅटफॉर्म शॅडोफॅक्सने जुलै २०२२ च्या अखेरीस संपूर्ण भारतभर ७५,००० वितरण भागीदारांची भरती करण्याचे जाहीर केले आहे.
गिग इकॉनॉमी जसजशी तेजीत आहे तसतसे, शॅडोफॅक्स त्याच्या वितरण जाळ्याचा विस्तार करताना अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करत आहे. गिग मनुष्यबळाचे सखोल आकलन केल्यानंतर या प्लॅटफॉर्मने एक भक्कम रायडर भागीदार समुदाय तयार केला आहे ज्याला अनेक फायदे मिळतात. प्लॅटफॉर्म त्याच्या वितरण भागीदारांना देतत असलेल्या ७.५ लाख रुपयांच्या अपघाती आणि ७.५ लाख रुपयांच्या आरोग्य कवचासह मोफत वैद्यकीय विम्याचा लाभ घेण्याबरोबरच रायडर्स दरमहा ३५,००० रुपयांपयर्यंत उत्पन्न कमावू शकतात. त्याचबरोबर प्लॅटफॉर्म त्यांच्या वितरण भागीदारांना देत करत असलेल्या ७.५ लाख रुपयांच्या अपघाती आणि आरोग्य कवचासह मोफत वैद्यकीय विम्याचा लाभ घेण्याबरोबरच शॅडोफॉक्स लवचिक कामाचे तास आणि त्याच्या वितरण भागीदारांच्या समुदायासाठी किमान कमाईची हमी यासारखे इतर रायडर बेनिफिट प्रोग्राम देखील देत आहे.
शॅडोफॅक्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, “गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील गिग अर्थव्यवस्थेने वेग घेतला आहे, जो देशातील तरुणांसाठी सर्वात पसंतीचा पर्याय आणि उत्पन्नाचा एक विश्वासार्ह स्त्रोत बनला आहे. शॅडोफॅक्सचे उद्दिष्ट देशभरात अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणे आहे, जे आम्हाला आमच्या विद्यमान १,२०,००० वितरण भागीदारांच्या समुदायाला बळकट करण्यास मदत करेल जे आमच्याशी जोडले जाण्याचा आम्हाला अभिमान आहे. शॅडोफॅक्स रायडर समुदायात सामील होण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येकाचे आम्ही स्वागत करतो आणि ही आगेकूच कायम ठेवण्यास आम्ही उत्सुक आहोत.”
याशिवाय, समान संधी देण्याचा एक भाग म्हणून, जे लांब पल्ल्याचा प्रवास करू शकत नाहीत परंतु पैसे कमवू इच्छितात/आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ इच्छिणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरावे म्हणून कंपनीने वय, लिंग किंवा वंश विचारात न घेता नोकरीसाठी पात्र लोकांना कामावर ठेवण्यासाठी खुली भूमिका ठेवली आहे.
सरळ ऑनबोर्डिंग प्रक्रियेसह, रायडर्स त्यांच्या बाईक किंवा सायकलवर डिलिव्हरी पूर्ण करू शकतात. ज्यांच्याकडे कोणतेही वाहन नाही त्यांच्यासाठी कंपनीकडे इलेक्ट्रिक वाहन (इव्ही) भाड्याने देण्याची योजना आहे (निवडक शहरे). इच्छुक उमेदवारांनी फक्त शॅडोफॅक्स अॅप डाउनलोड करणे, पडताळणीसाठी त्यांचे पॅन आणि आधार कार्ड अपलोड करणे आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जवळच्या ऑनबोर्डिंग केंद्राला भेट देणे आवश्यक आहे. औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर, रायडर्स काही तासांत रस्त्यावर उतरू शकतात.