दैनिक स्थैर्य । दि. १९ ऑगस्ट २०२२ । मुंबई । दळणवळणाच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत क्राउडसोर्स्ड थर्ड-पार्टी लॉजिस्टिक्स सेवा पुरविणारे भारताचे सर्वात मोठे वाहतूक व्यासपीठ शॅडोफॅक्स टेक्नोलॉजीजने यशस्वीरित्या त्यांची वार्षिक बिग मनी विकेंड मोहिम पूर्ण केली आहे. व्यासपीठाचा बिग मनी विकेंड उत्साहात समाप्त झाला, जेथे बेंगळुरूमधील राइडर संजीवा जे ला मारूती अल्टोचे भव्य बक्षीस मिळाले, पुण्यातील शिवकुमार रावणला रेफ्रिजरेटर मिळाला आणि बेंगळुरूमधील शिव एसकेला टेलिव्हिजन मिळाला. तसेच ५५००० डिलिव्हरी सहयोगींनी सहभाग घेतलेल्या या इव्हेण्टमध्ये बेंगळुरूमधील विजया कुमार केने ३ दिवसांमध्ये १४,८५५ कमावले.
भारतातील आगामी भव्य सणासुदीच्या काळापूर्वी समाप्त झालेल्या या ३ दिवसीय मोहिमेला ५ ऑगस्ट रोजी सुरूवात झाली होती. ही व्यासपीठावरील डिलिव्हरी सहयोगींच्या व्यापक समुदायांमधील बहुप्रतिक्षित मोहिम ठरली. ही मोहिम त्यांना आकर्षक इन्सेटिव्ह्जसह त्यांचे उत्पन्न वाढवण्यास सक्षम करते. शॅडोफॅक्ससाठी उत्सवी इव्हेण्ट असलेल्या या मोहिमेच्या ३ दिवसांदरम्यान मागील काही विकेंड्सच्या तुलनेत व्यासपीठावरील ऑर्डर्समध्ये ५० टक्के वाढ दिसण्यात आली.
शॅडोफॅक्स टेक्नोलॉजीजचे सह-संस्थापक व सीओओ प्रहर्ष चंद्रा म्हणाले, “आम्हाला घोषणा करताना आनंद होत आहे की, बिग मनी विकेंडला प्रचंड यश मिळाले आहे. या वार्षिक मोहिमेसह आमचा आमच्या डिलिव्हरी सहयोगींना सर्वोत्तम उत्पन्न कमावण्याची संधी देण्याचा मनसुबा आहे. आम्हाला आनंद होत आहे की, मागील मोहिमांप्रमाणे या मोहिमेला देखील अद्भुत प्रतिसाद मिळाला. आम्हाला विश्वास आहे की, आगामी महिन्यांमध्ये आमच्या या मोहिमेत लक्षणीय वाढ दिसण्यात येईल.”
शॅडोफॅक्सने नुकतेच लॉन्च केलेले अद्वितीय अॅप ‘सुपर अॅप; एकच इंटरफेसच्या माध्यमातून विविध व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी डिलिव्हरी सहयोगींना भरपूर संधी देईल. व्यासपीठावर सध्या १०० हून अधिक ब्रॅण्ड्स आहेत, जे त्यांच्या डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह्जना स्थिर व सर्वोत्तम उत्पन्न पर्याय देतात.