
दैनिक स्थैर्य । दि. १४ डिसेंबर २०२२ । मुंबई । शॅडोफॅक्स टेक्नोलॉजीज या भारतातील लास्ट-माइल डिलिव्हरीसाठी सर्वात मोठ्या क्राऊडसोर्स थर्ड-पार्टी लॉजिस्टिक्स व्यासपीठाने नुकतेच आयोजित केलेल्या शॅडोफॅक्स चॅम्पियन्स लीग या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या रिफरल कॉन्टेस्टच्या विजेत्यांची घोषणा केली आहे. शॅडोफॅक्ससाठी डिलिव्हरी भागीदारांच्या नियुक्तीला गती देण्याकरिता ही स्पर्धा सुरू करण्यात आली होती.
वितरण भागीदारांनी जवळपास ४,००० रूपयांचा रिफरल बोनस मिळवला आणि नवीन सहभागींनी या उपक्रमाच्या माध्यमातून कंपनीमध्ये सामील झाल्यावर १,००० रूपये मिळवले. विजेता बेंगळुरू येथील हितेन नागवाडिया याने रेनॉल्ट क्विड कार जिंकली. हैदराबादमधील प्रथम उपविजेता सय्यद अब्दुल रहमानने रॉयल एनफिल्ड बुलेट जिंकली आणि बंगळुरू येथील द्वितीय उपविजेता धारावथ मुरलीने थायलंडकरिता ट्रिप जिंकली. शॅडोफॅक्सने आपल्या वितरण भागीदारांना सणासुदीच्या काळात सर्वाधिक ऑर्डर दिल्याबद्दल सोन्याची नाणी आणि रोख बक्षिसे दिली.
शॅडोफॅक्सचे प्रवक्ता म्हणाले, “आमच्या इन-हाऊस टॅलेण्टला अधिक निपुण करण्याचा आणि विकासाला चालना देण्याचा शॅडोफॅक्स चॅम्पियन्स लीगमागील उद्देश होता. आम्हाला या मोहिमेसाठी मिळालेला प्रतिसाद पाहून आनंद होत आहे आणि आमच्या निष्ठावान भागीदारांना सन्मानित व पुरस्कारित करण्याचा देखील आनंद होत आहे. आम्ही संपन्न व प्रयत्नशील कार्यस्थळ वितरण भागीदार समुदाय प्रदान करण्याच्या आमच्या ध्येयाशी संलग्न असे उपक्रम सादर करत राहू.’’