एसएफआय चा राज्यव्यापी ध्वजदिन व शहीद सुदीप्तो गुप्ता जन्मदिन सोलापुरात साजरा


दैनिक स्थैर्य । दि. ०९ नोव्हेंबर २०२२ । सोलापूर । एसएफआयच्या १८व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाच्या निमित्ताने *ध्वज दिन* दिनांक ८ नोव्हेंबर रोजी राज्यभरात साजरा करण्यात यावा. अशी SFI महाराष्ट्र राज्य कमिटीने हाक दिली आहे.
आज स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया – एसएफआय सोलापूर जिल्हा कमिटी च्यावतीने स्वातंत्र, लोकशाही, समाजवादाचा झेंडा मा. जिल्हाध्यक्ष & जिल्हा सहसचिव राहुल जाधव यांच्या हस्ते फडकावून ध्वज दिन उत्साहत साजरा करण्यात आले.
८ नोव्हेंबर हा पश्चिम बंगालमधील एसएफआयचे नेते राहिलेले शहीद सुदिप्तो गुप्ता यांचा जन्मदिन आहे. २०१३मध्ये ममता सरकारच्या पोलिसांनी कोलकाता येथे एसएफआयच्या आंदोलनावर अमानुष लाठीहल्ला केला होता. त्यात सुदिप्तो हे शहीद झाले. शहीद सुदीप्तो याने स्वातंत्र्य, लोकशाही, समाजवादाचा झेंडा कायम फडकवत राहावा, अभ्यास आणि संघर्षाची लढाई मजबूत व्हावी, यासाठी आपले प्राण त्यागले. शहीद सुदीप्तो SFI च्या प्रत्येक कृतीत आणि आंदोलनात कायम जिवंत राहील. आज त्यांना देखील अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी, जि.स.मं सदस्य विजय साबळे, जि.क सदस्य नेहा वाघमोडे, प्रशांत आडम, अनिल बोगा, नेत्रा वाघमोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!