
स्थैर्य, फलटण, दि. 9 नोव्हेंबर : तिरकवाडी, ता. फलटण येथील जय भवानी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे ‘संविधानाची पंच्याहत्तरी’कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून अॅड. श्री. संजय कांबळे पाटील हे होते.
यावेळी विद्यार्थ्यांना प्रमुख वक्त्यांनी व्याख्यानातून संविधानाची ओळख करून दिली. विद्यार्थ्यांना स्लाईड शोच्या माध्यमातून सादरीकरण दाखविण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला. संविधानाचे विस्तृत मांडणी करून काही उदाहरणे देऊन संवादात्मक मार्गदर्शन केले. मुलांनी उस्फूर्तपणे सहभाग दर्शवून प्रश्नावली सोडवली.
या कार्यक्रमात इयत्ता नववी, दहावी, 11 वी व 12 वीमधील एकूण 657 विद्यार्थी विद्यार्थी सहभागी झाले होते. सागर खताळ यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य संदीप नाळे आभार आभार मानले.
