
स्थैर्य, फलटण, दि. 10 नोव्हेंबर : तिरकवाडी, ता. फलटण येथील जय भवानी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे ‘संविधानाची पंच्याहत्तरी’कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून अॅड. श्री. संजय कांबळे पाटील हे होते.
अॅड. संजय कांबळे पाटील म्हणाले की, आपल्याला राज्यघटनेने स्वातंत्र्य, समता व बंधुत्व दिलेले आहे. हा राज्यघटनेचा आत्मा आहे. राज्यघटनेने जगण्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, माहिती मागण्याचा अधिकार, मतदानाचा अधिकार तसेच विचार व मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य, हिंडण्या फिरण्याचे स्वातंत्र्य, संपत्ती व धन कमवण्याचे स्वातंत्र्य अशी अनेक स्वातंत्रे दिलेली आहेत. तसेच कायद्यापुढे सर्व समान असून स्त्री-पुरुष, काळा – गोरा, धर्म- जात असा कोणता ही भेदभाव न करता सर्वांना समान संधी राज्यघटनेने दिलेली आहे.
संविधानाच्या रूपाने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकार केला. व 26 जानेवारी 1950 ला आपल्या देशामध्ये या भारतीय राज्यघटनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी ला सुरुवात केली. या गोष्टीला आता या वर्षी 75 वर्षे पूर्ण होत आहेत.
देशाला व भारतीय संविधानाला आज परकीय शक्तीकडूनही धोका निर्माण होत आहे. यासाठी सर्वांनी जागृत असणे गरजेचे आहे. देश हितासाठी व देश रक्षणासाठी काम करणार्या व्यक्तींना मतदान करणे, हे आपले कर्तव्य आहे. संविधान दिन 26 नोव्हेंबर ला साजरा करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात इयत्ता नववी, दहावी, 11 वी व 12 वीमधील एकूण 657 विद्यार्थी विद्यार्थी सहभागी झाले होते. सागर खताळ यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य संदीप नाळे आभार आभार मानले. यावेळी संस्थेचे प्राचार्य संदीप नाळे, शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी वर्ग, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

