
दैनिक स्थैर्य । 08 जुलै 2025 । कोळकी । आळंदी ते पंढरपूर महामार्गावर फलटण येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा विसावतो. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने लाखो वारकरी फलटणमध्ये विसावतात, त्यांची सेवा करणे हे आमचे कर्त्यव्य असल्याचे मत स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
कोळकी येथे भारतीय जनता पार्टीच्यावतीने वारकर्यांना खाऊचे वाटप करण्यात आले होते. त्यावेळी स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर बोलत होते.
यावेळी फलटण पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन रणवरे, युवा नेते विकास नाळे, संजय देशमुख, कामगार नेते बाळासाहेब काशीद, किरण जाधव, सागर चव्हाण यांच्यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भारतीय जनता पार्टी, कोळकीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले व आगामी काळामध्ये कोळकी गावामध्ये भाजपा विविध समाजाच्या हिताच्या दृष्टीने उपक्रम राबवले, असा विश्वास संजय देशमुख यांनी व्यक्त केला आहे.