दैनिक स्थैर्य | दि. २४ डिसेंबर २०२४ | बारामती |
बारामती ‘मेडिकल हब’ होत असताना बारामतीच्या आसपासच्या जिल्ह्यातील व तालुक्यातील अनेक रुग्ण व स्थानिक रुग्ण यांना उत्कृष्ट सेवा मिळावी व ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ समजून वैद्यकीय क्षेत्राने काम करावे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
बारामती एमआयडीसी येथील डॉ. अमित भापकर यांच्या स्वयंभू हॉस्पिटलच्या अंतर्गत असलेल्या माऊली मेडिकल व विघ्नहर्ता लॅबचा उद्घाटन समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रविवार, २२ डिसेंबर रोजी संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव, तालुका अध्यक्ष राजवर्धन शिंदे, डॉ. राधेय खलाटे, माळेगावचे चेअरमन अॅड. केशव जगताप, डॉ. रेश्मा भापकर, विशाल साळवे व सुयश ऑटोचे कामगार नेते भारत जाधव, विवेक टेंगले आदी मान्यवर उपस्थित होते.
गुणवत्तापूर्ण व दर्जात्मक, सकारत्मक सेवा दिल्याने रुग्ण लवकर बरा होतो, एकाच छताखाली सर्वकाही सुविधा रुग्णांना दिल्यामुळे वेळ आणि पैसा वाचतो. त्यामुळे मेडिकल स्टोअर्स व लॅब सुरू केल्याचे डॉ. अमित भापकर यांनी सांगितले.
स्वागत विशाल साळवे व विवेक टेंगले यांनी केले तर सूत्रसंचालन सावळे-पाटील यांनी केले व आभार डॉ. राधेय खलाटे यांनी मानले.