सेवा प्रवेश नियम शासनाच्या मान्यतेसाठी सादर करावेत – बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०३ नोव्हेंबर २०२२ । मुंबई । महाराष्ट्र सागरी मंडळाच्या काही पदांचे प्रलंबित सेवा प्रवेश नियम मंडळाच्या शासनाच्या मान्यतेसाठी सादर करावेत. उर्वरीत पदांसाठी मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर शासनाच्या मान्यतेसाठी सादर करावेत, असे निर्देश राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

महाराष्ट्र सागरी मंडळ, गृह (बंदरे व परिवहन) विभागाची सेवा प्रवेश नियम-विनियम करण्याबाबत बैठक मंत्रालयात झाली, त्यावेळी मंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी परिवहन व बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी, बंदरे विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात, मुख्य बंदर अधिकारी कॅ. संजय शर्मा आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. भुसे म्हणाले, सेवा प्रवेश नियम हे शासनाच्या कोणत्याही पदाच्या भरतीसाठी आवश्यक असणारा मूलभूत कायदेशीर दस्तऐवज आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयाद्वारे सेवा प्रवेशाचा आदर्श नमुना देण्यात आला आहे. त्यानुसार सेवा प्रवेश अद्ययावत करण्यात यावेत असे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सैनी म्हणाले, महाराष्ट्र सागरी मंडळात 59 संवर्गात 525 पदे मंजूर असून त्यामध्ये तांत्रिक व अतांत्रिक पदांचा समावेश आहे. त्यापैकी 45 संवर्गाचे सेवा प्रवेश नियम तयार करण्यात आले आहेत. उर्वरित 14 संवर्गाचे सेवा प्रवेश नियम तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच 45 पैकी 38 संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमास मंडळाची मान्यता घेण्यात आली आहे. उर्वरित सात संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमास मंडळाच्या पुढील बैठकीत मान्यता घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!