• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

प्रवचने – मी भगवंताचा आहे ही अखंड जाणीव ठेवावी

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
मे 17, 2023
in इतर, देश विदेश, प्रादेशिक, फलटण, बारामती, लेख, संपादकीय, सातारा जिल्हा

आपल्याला काही हवे असे वाटले आणि ते तसे झाले नाही, म्हणजे तळमळ लागते. परंतु सर्व परमात्माच करतो आहे असे मानले, म्हणजे काळजीचे कारण उरत नाही. आपण ‘देव आहे’ असे मानतो, पण आपला तो खरा विश्वास आहे का ? एकादा मनुष्य बुडायला लागला, म्हणजे दगड जरी त्याच्या हाताला लागला तरी हा आपल्याला तारील असा त्याला विश्वास वाटतो, आणि तो त्याला धरून आपणही त्याच्या बरोबर बुडतो. म्हणून म्हणतो, ‘देव आहे’ असा आपला खरा विश्वास नसतो, आपण नुसते तोंडाने म्हणतो एवढेच ! नाही तर आपल्याला काळजी का वाटावी ? प्रत्यक्ष देव पुढे उभा राहिला तरी आपल्या मागची काळजी आणि सुखदुःखे संपणार नाहीत. याचे कारण म्हणजे, परमेश्वरावरचा आपला विश्वासच डळमळीत असतो. वास्तविक, परमेश्वराची इच्छा प्रमाण मानल्यावर सुखदुःख मानण्याचे कारण नाही. परमेश्वर सर्वव्यापी आहे. तो जसा माझ्यात आहे, तसा दुसर्‍यातही आहे; म्हणून दुसर्‍याने काहीही केले तरी आपल्याला त्याबद्दल काही वाटण्याचे कारण नाही. तरी अशी भावना ठेवून वागावे की, मी देवाचा आहे, तो माझा पाठिराखा आहे, आणि म्हणून काही झाले तरी मला काळजी करण्याचे कारण नाही. हे सर्व नामस्मरण केल्याने साधते. म्हणून मी आजपासून सतत नामस्मरण करीत राहणार असा निश्चय करावा, आणि त्या दृष्टीने प्रयत्‍न चालू ठेवावा. परमेश्वराला शरण जाऊन ‘मला तसे वागण्याची बुद्धी द्यावी’ म्हणून त्याची प्रार्थना करावी. मनाला पहिल्याने थोडी बळजबरी करावी लागेल. लहान मुलांना शाळेत जाण्याकरिता सुरुवातीला थोडी बळजबरी करावी लागते. मुलीला प्रथम सासरी पाठवितानाही तसेच करावे लागते. आपण थोडा तरी नियम करावा. उदाहरणार्थ, जेवायच्या आधी, रात्री निजताना, सकाळी उठताना नाम घ्यायचेच; भगवंताची आठवण करायचीच. असे केले तर ते आयुष्यात उपयोगी पडेल. प्रपंचाचा प्रयत्‍न आज जो चालू आहे तसाच करीत जावा, पण ‘मला भगवंत हवा’ असे म्हणत जावे. मनामध्ये भगवंताची आस ठेवावी, म्हणजे हळूहळू ती वाढत जाईल, आणि तिचे पर्यवसान ध्यासामध्ये होईल. समजा एखाद्या माणसाला घर बांधावयाचे आहे; ‘मला घर बांधायचे आहे’ असे तो म्हणत जातो, आणि त्यासाठी पैसे शिल्लक टाकतो. दागिने करायची वेळ आली तर ते नको म्हणतो, कारण पुढे घर बांधायचे आहे. हे जसे खरे, त्याचप्रमाणे ‘भगवंत मला हवा आहे’ असे नुसते म्हणत गेल्याने देखील मनुष्य निव्वळ प्रपंचातच गुरफटून न राहता, विषय बेताने भोगेल. खरा ध्यास लागल्यावर, ती वस्तू मिळाल्यावाचून चैन पडणारच नाही.

ज्याचा भगवंतावर विश्वास, त्याला समाधान खास !


Previous Post

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अद्ययावत व सज्ज ठेवा – विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

Next Post

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना

Next Post

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना

ताज्या बातम्या

राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील ६७ शैक्षणिक संस्थांचा समावेश

जून 8, 2023

नानासाहेब थोरात यांची ‘जिनिव्हा’ परिषदे साठी निवड

जून 8, 2023

शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण

जून 8, 2023

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त ‘दिलखुलास’ कार्यक्रमात अमित वाडेकर यांचे व्याख्यान

जून 8, 2023

रवींद्र कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठ; डॉ. सुरेश गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

जून 8, 2023

अन्न प्रक्रिया उद्योजकांसाठी संधी : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जून 8, 2023

त्रिलोकेश फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून मंगेश पाटील यांची गगन भरारी

जून 8, 2023
रुग्णांना मार्गदर्शन करताना सुनंदा पवार व इतर

श्री श्री नेत्रालय बारामती येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

जून 8, 2023

फलटणमध्ये पालखी सोहळ्याचे बारकाईने नियोजन करा : जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी

जून 8, 2023

सुरवडीत साळुंखे – पाटलांच्या घरी मंत्री ना. विखे – पाटील

जून 8, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!