स्थैर्य, फलटण दि.०९ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विलगीकरण पाळून काळजी घ्यावी असे आवाहन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या व्हॉटस्अॅप स्टेटसद्वारे केले आहे.
‘‘आपल्याकडे कोविडची दुसरी लाट संपत आहे. सातारा जिल्हा अजूनही झगडतोय. विलगीकरण पाळणे आवश्यक आहे. इंग्लंडची बातमी आहे की तिसरी लाट सुरु झाली आहे. घाबरायचे कारण नाही. काळजी घेणे’’, अशा शब्दात ना.श्रीमंत रामराजे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.