पोस्ट खात्यामार्फत दिवाळी भेट कार्ड पाठविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ६ ऑक्टोंबर २०२२ । सातारा । दिवाळी 2022 सणानिमित्त पाठविण्यात येणाऱ्या शुभेच्छा पत्र/टपाल (दिवाळी ग्रीटिंग्ज) लवकरात लवकर पोहचवण्यासाठी जिल्ह्यातील काही मोठ्या पोस्ट ऑफिसमध्ये खास स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

सातारा प्रधान डाकघर, सातारा शहर, एम. आय. डी. सी. सातारा, संगमनगर सातारा, वाई, कोरेगांव, लोणंद, महाबळेश्वर, फलटण, पाचगणी. या कार्यालयात दिवाळी भेट कार्ड स्विकारण्यासाठी स्वतंत्र पत्रपेट्या किंवा ट्रे ठेवण्यात आलेल्या आहेत.

सातारा शहर आणि‍ि जिल्हा (415001 ते 415540 पर्यंतचे पिनकोड), पुणे शहर (411 ने सुरु होणारे पिनकोड), पुणे जिल्हा (410 ते 412), सांगली जिल्हा 415301 ते 415499च क्रमांक), कोल्हापूर जिल्हा (416) उर्वरित महाराष्ट्र ( 40 ते 44), उर्वरित भारत.

तरी जिल्ह्यातील नागरिकांनी आपली दिवाळी भेट कार्ड पाठविण्यासाठी वरील व्यवस्थेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रवर अधिक्षक डाकघर, सातारा विभाग यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!