सर्वच क्षेत्रांत गुंतवणूकदारांनी विक्री केल्याने सेन्सेक्स, निफ्टीत २ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, 11 : शेअर बाजारात आज सर्वच क्षेत्रातील विक्रीमुळे तीव्र घसरण नोंदवली गेली. विक्रीचा सर्वात मोठा फटका बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील शेअर्सला बसला. त्यानंतर ऑटोमोबाइल, धातू आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले.

एसअँडपी बीएसई सेन्सेक्स निर्देशांक आज २.०७% किंवा ७०८ अंकांनी घसरून ३३,५३८.३७ अंकांवर पोहोचला. तर एनएसई निफ्टी-५० बेंचमार्क २.१२ % नी घसरून ९,९०२ वर आला. दुपारनंतरच्या व्यापारात वित्तीय शेअर्समधील विक्री वाढली. त्याचा दबाव ऑटोमोबाइल, धातू आणि फार्मास्युटिकल्ससारख्या क्षेत्रांवरही दिसून आला. निफ्टी बँक इंडेक्समध्ये २.७२ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. तर निफ्टी पीएसईमध्ये १५१ टक्क्यांची घसरण झाली.

एनएसईतील टॉप गेनर्समध्ये पीएनबी हौसिंग (५%), डिशटीव्ही (४.९६%), फ्यूचर रिटेल (४.९८%), इंडसइंड बँक (४.७१%) यांचा समावेश आहे. एनएसईमधील टॉप लूझध्ये आयडिया (१३.३६%), भारती इंफ्राटेल (९.४१%), झी एंटरटेनमेंट (७.३०%), एसबीआय (५.६२%) यांचा समावेश झाला.

जागतिक बाजारपेठ: जागतिक बाजारासाठीदेखील आजचा दिवस वाईट ठरला. आशियात १० दिवसांची सकारात्मकता आज गमावलेली दिसून आली. बाजार नकारात्मक स्थितीवर बंद झाला. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक ०.४४ टक्के आणि दक्षिण कोरियातील केओएसपीआय निर्देशांक ०.२७ टक्क्यांखाली होता. युरोपीय बाजारांनी थकव्याचे संकेत दर्शवले. कारण गुंतवणूकदारांना आपल्या अर्थव्यवस्थांमध्ये आर्थिक सुधारणा होण्याच्या शक्यतेवर शंकाच आहे.

जगभरातील स्टॉक्सच्या ४९-देशातील इंडेक्स एमएससीआयमध्ये ०.७५ टक्क्यांची घट दिसून आली, पाच आठवड्यातील आजच्या दिवसाचे सर्वात मोठे नुकसान ठरले. कमोडिटीजमध्ये तेलाच्या किंमतीत घसरण नोंदवली गेली. कारण अमेरिकेतील कच्च्या मालाच्या इन्व्हेंटरीमध्ये विक्रमी बिल्ड-अपमुळे घसरण नोंदवण्यात आली. यूएस फेडरल रिझर्व्हकडून अमेरिकी अर्थव्यवस्थेसाठी निगेटिव्ह आउटलूक वक्तव्यामुळेही कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण

झाली. यूएस फेडनुसार, जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था या वर्षी ६.५ टक्क्यांनी कमी होईल. केंद्रीय बँकेने ट्रेझरीमध्ये सध्याच्या ८० डॉलर बिलियन प्रति महिना या सध्याच्या गतीने बाँड खरेदी आणि तसेच तारण असलेल्या सिक्युरिटीजमध्ये रोखे खरेदी चालू ठेवण्याचे वचन दिले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!