दैनिक स्थैर्य | दि. २६ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
दलित पँथरचे धडाडीचे कार्यकर्ते व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) चे ज्येष्ठ नेते सुनिल भालेराव यांचा त्रिमली, ता. खटाव येथे वाढदिवस उत्साहात साजरा झाला.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते विजय येवले, ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत प्रोफेसर डॉ. प्रभाकर पवार, अजित नलावडे, कुणाल गडांकुश, मयूर बनसोडे उपस्थित होते.
सुनिल भालेराव यांच्या जीवन कार्यावर बोलताना प्रोफेसर डॉ. प्रभाकर रा. पवार म्हणाले, दलित पँथरच्या स्थापनेपासून सुनिल भालेराव दलित समाजावर होणार्या अन्याय अत्याचारच्या विरोधात आवाज उठवत आले आहेत. त्यांना खा. रामदास आठवले जीव की प्राण वाटतात, म्हणून ते एकच आदर्श व प्रेरणा आहेत. आर. पी. आय.च्या बांधणीसाठी खेड्यापाड्यात जाऊन ते सर्वच समाजाला विश्वासात घेऊन काम करत आहेत. कुटुंबाबरोबर समाजाच्या विकासासाठी ते अहोरात्र कार्यरत असतात. त्यांच्या मानवमूलभूत कार्याबद्दल व वाढदिवसाबद्दल त्यांना उदंड आयुष्य लाभो, हीच बुद्धचरणी प्राथर्ना करतो.
यावेळी विजय येवले यांनीही सुनील भालेराव यांच्याविषयी आपले विचार व्यत केले.